आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या शासनाने १२ ते १४ या वयोगटातील बालकांचे कोरोनापासून बचाव करणारी उपयुक्त असे लसीकरण शाळा स्तरावर सुरु केले आहे. परतूर तालुक्यातील आष्टी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या पिंपळी धामणगाव उपकेंद्रातील जिलहा परिषद शाळा धामणगाव येथे उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ग्रामस्थांच्या आग्रहास्तव रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
विशेष म्हणजे या लसीकरण सत्रास सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून १०० टक्के लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करत इयत्ता सातवी व आठवीच्या तब्बल ४९ विद्यार्थ्यांनी लस टाेचून घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेतन खंदारे, डॉ. चैतन्य डाके, धामणगाव उपकेंद्राचे डॉ. प्रदीप राठोड, दत्तात्रय डाके, गंगाधर पुजरवाड, सुंदरा आम्ले, समशेर शेख, शिक्षक सलाउद्दीन देशमुख, अशिष हल्लाळे, शेख निहाल, सरपंच दिपक शिर्के, उपसरपंच अमोल पवार, संतोष खंडागळे, संतोष वाहुळे, बाळासाहेब वाहुळे, बाबुराव शिंदे, आशाबाई बन, सुशिला लोंढे, कुसुम वाहुळे, अर्चना कोठाळे यांच्यासह आदी उपस्थित होते..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.