आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:केंद्राने हात आखडता घेतल्याने लसींचा तुटवडा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने आखडता हात घेतल्यामुळे राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. दैनंदिन ८ लाख डोसची गरज असताना शनिवारी फक्त ५० हजार डोस मिळाले. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी केंद्राने मुबलक लसींचा पुरवठा करायला हवा,अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली असून यात वित्त, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे सचिव आहेत. या समितीने एक प्रेझेंटेशन तयार करून ते मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री व आरोग्य मंत्रालयाकडे करायचे आहे. यात कुठल्या घटकाला मोफत लस देता येईल किंवा कसे याची माहिती असेल, असेही टोपे म्हणाले.

लसींची उपलब्धता, माफक दर ही दोन मोठी आव्हाने
सीरमचा केंद्र सरकार सोबत येत्या २० मेपर्यंत करार आहे. यामुळे राज्याला लगेच लस मिळेल असे दिसत नाही. १ मेपासून १८ ते ४४ वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू करायचे म्हटले तरी लसींची उपलब्धता व किफायतशीर दर ही दोन मोठी आव्हाने आहेत. भारत बायोटेक कंपनीसह लसींच्या आयातीबाबतही चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...