आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेम व्यक्त करण्याचा सप्ताह म्हणून तरुणाईला व्हॅलेंटाइन डे आणि व्हॅलेंटाइन वीकची प्रतीक्षा असते. यासाठी विविध प्रकारच्या गिफ्ट शॉपी सज्ज झाल्या आहेत. दुसरीकडे, फूल उत्पादक शेतकऱ्यांनीही या सप्ताहाकडे संधी म्हणून पाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात खास लांब देठ असलेली गुलाबाची फुले पाठवण्यास सुरुवात केली आहे. व्हॅलेंटाइन सप्ताहाला मंगळवारी रोझ डेने सुरुवात होत आहे. त्यामुळे जालना शहरातील होलसेल बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे.
जालना तालुक्यातील वाघरूळ, पानशेंद्रा, जामवाडी, पाचनवडगाव, लालवाडी, चितळी-पुतळी, रेवगाव या गावांसह बदनापूर तालुक्यातील तपोवन गावात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. शेडनेटमध्ये सध्या जरबेरा आणि गुलाब या फुलांची शेती केली जात आहे. हे शेतकरी बाजार समितीमधील फूल बाजारात दररोज विक्रीसाठी फुले आणतात. येथे ७ ते ८ व्यापारी फुलांचा घाऊक व्यापार करतात. तेथून किरकोळ विक्रेते फुले घेऊन जातात. गेल्या ४-५ वर्षांपासून जालना शहरात व्हॅलेंटाइन वीकसाठी फुलांची आगाऊ नोंदणी करण्याचा ट्रेंड आला आहे. यात प्रामुख्याने कॅफेचालक, युवकांचे ग्रुप फुलांची आगाऊ नोंदणी करतात. या वर्षीही अनेकांनी नोंदणी केली आहे.
आठवडाभर गुलाबाला मागणी चांगली राहणार आता आठवडाभर गुलाबाच्या फुलांना चांगली मागणी राहील. मंगळवारपासून दर वेगळे राहतील. सध्या लग्न, रिसेप्शन, साखरपुडा आदींसाठी किरकोळ विक्रेत्यांकडे गुलाबाच्या फुलांची आगाऊ नोंदणी केली जाते. व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाबाची मागणी होत आहे. -हारुण शेख, घाऊक विक्रेता मागणीप्रमाणे शेतकऱ्यांकडून पुरवठा एरव्ही पूजेसाठी, बुकेसाठी आणि हार तयार करण्यासाठी जी गुलाबाची फुले बाजारात पाठवली जातात, त्या गुलाबाच्या फुलांचा देठ अगदी छोटा असतो. मात्र, व्हॅलेंटाइनसाठी खास लांब देठ असलेले गुलाब बाजारात येताे. घाऊक विक्री करणारे व्यापारी त्यासाठी अगोदरच शेतकऱ्यांना तशा सूचना देतात, चार पैसे अधिकचे मिळत असल्याने शेतकरीही मागणी तसा पुरवठा करीत असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.