आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ईफेक्ट‎:वालसावंगी ते पारध रस्त्याच्या कामाला सुरुवात‎

शेलुद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेलूद भोकरदन तालुक्यातील‎ वालसावंगी ते पारध रस्त्यावर काही‎ महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला‎ सुरुवात झाली खरी मात्र, पारध‎ वरुन केवळ अर्धाच ०३ किलोमीटर‎ रस्ता म्हसोबा महाराज देवस्थान‎ पर्यंत डांबरीकरण करुन पुढील अर्धा‎ ०४ किलोमीटर वालसावंगी कडील‎ उर्वरित रस्ता तसाच अर्धवट‎ सोडण्यात आला होता. या‎ रस्त्याबाबत दिव्य मराठीने वृत्त‎ प्रसिध्द केल्यानंतर याचा परिणाम‎ म्हणुन काम हाती घेण्यात आले‎ आहे.‎

वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा‎ सामना करावा लागत होता. या‎ राहीलेल्या अर्धवट रस्त्यावर वाहन‎ चालवताना अगदी जीव मुठीत‎ धरून वाहने वाहनधारकांना‎ चालवावी लागत होती. गेल्या‎ पावसाळ्यात तर अनेक‎ वाहनचालक दुचाकीवरून घसरुन‎ जखमी झाल्यांच्या घटना घडल्या‎ होत्या. या बाबतीत मात्र संबंधित‎ विभागाचे या रस्त्याच्या कामाकडे‎ पुर्णतः दुर्लक्ष झाले होते.

दरम्यान‎ अर्धवट रस्त्याच्या कामाबाबत काही‎ दिवसांपूर्वी ३१ डिसेंबर रोजी दिव्य‎ मराठी अंकात बातमी प्रकाशित‎ करण्यात आली होती. त्या बातमीचा‎ परिणाम म्हणून अखेर आता या‎ अर्धवट कामाला सुरुवात झाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा‎ दिलासा मिळाला आहे. दरम्यान‎ वाहनचालकांनी रस्त्याचे काम‎ दर्जेदार झाले पाहिजे अशी आशा‎ व्यक्त केली आहे. वालसावंगी ते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पारध रस्त्यावरील अर्धवट कामाला‎ सुरुवात झाल्याने वाहणधारकांना‎ मोठा आधार हाेईल असे वाहन‎ चालक हरिदास गवळी यांनी‎ सांगीतले.‎

बातम्या आणखी आहेत...