आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:लोखंडी रॉडने मारहाण करून वाहनांची तोडफोड; दाेघे जखमी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल भरत असतांना चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. शिवाय, कारसह दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील सारथी पेट्रोलपंपावर शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे जण किरकोळ जखमी आहे.

जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील विशाल राजेंद्र छडीदार शनिवारी रात्री जालना औरंगाबाद रोडवरील दावलवाडी जवळील सारथी पेट्रोलपंपावर उभा होता. त्याचवेळी काही तरुणांनी तेथे उभा असलेल्या तीन तरूणांनासह फिर्यादी विशाल छडीदार यांना शिविगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात दोघे जण जखमी झाले आहे. त्यानंतर अज्ञात तीन ते चार आरोपींनी फिर्यादीची कार व साक्षीदार यांच्या दोन दुचाकींची तोडफोड केली.

याची माहिती बदनापूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच, बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या प्रकरणी विशाल छडीदार यांच्या फिर्यादीवरून चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधीक्षक नीरज राजगुरू हे करीत आहेत

बातम्या आणखी आहेत...