आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जालन्यातील सेंट जॉन्स शाळेत स्पोर्ट‌्स डे ला विविध उपक्रम

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सेंट जॉन्स शाळेत ‘स्पोर्ट‌्स डे’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.प्रारंभी बायबल वाचन, प्राचीन प्रार्थना गिते, स्वागत गित, ध्वजारोहन डिक्लेरेशन ऑफ लिस्ट ओपन व फुगे आकाशात सोडून करण्यात आले. यावेळी जालना फुटबॉल असोसिएशनचे महासचिव फेरोज अली, प्रविणा यादव, डॉ. मनिषा जायभाये, डॉ. हर्षदा कोल्हे, अॅड. दिपाली भालशंकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी शिशू वर्गातील विद्यार्थ्यांपासून ते इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची क्रिडा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांसाठी संगीत खुर्ची घेण्यात आली होती. विविध खेळांमध्ये पीटी, बलून ड्रील, दुपट्टा ड्रील आणि अ‍ॅरोटिक्स घेण्यात आले. संचालक डॉ. ए. एफ. पिंटो, संचालिका ग्रेस पिंटो आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ओवरऑल चॅम्पीयनशीप ग्रिन हाऊसच्या विद्यार्थ्यांनी जिंकली. यावेळी शिक्षक, पालकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...