आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:बनटाकळी येथे शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

अंबड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बनटाकळी येथे चारित्र्य चक्रवर्ती आचार्य श्री शांतिसागर महाराज पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव मुनीश्री प्रभावसागर महाराज यांच्या सान्निध्यात व दिगंबर जैन समाज बनटाकळी ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बबनराव गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आदिनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये भगवंतावर पंचामृत अभिषेक करण्यात आला. यामध्ये शांतिधारा अभिषेकचा मान हिरालाल लठ्ठे यांचे हस्ते करण्यात आला. नंतर अष्टद्रव्यांनी भगवंताची व महाराजांची पूजा करण्यात आली. गुरुदेवांची आहारचर्या झाली व तुतारीच्या निदानात सनई पिपाण्याच्या स्वरात मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये ढोल ताशा, लेझीम पथक, टिपऱ्या पथक, महिलांचे लेझिम पथकात अंबड व पानेगाव येथील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी ग्रामस्थांनी ४५ बैलगाड्या, १६ ट्रॅक्टर, शेकडो दुचाकीची सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीची सांगता जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळाच्या प्रांगणात करण्यात येऊन तेथे गुरुदेवांचे प्रवचन झाले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी,कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, अंबड, पानेगाव, कासारवाडी, झिरपी, सोनकपिंपळगाव आदी ठिकाणाहून भाविकांनी हजेरी लावली. शांतीनाथ मोहळे, परसराम दिडपोळे, काशिनाथ भेंडुळकर, चिंतामणी गव्हाणे, दत्ताजी लहामागे, अंजनाताई देवळकर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...