आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:हिवरखेडा येथे जयराम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हिवरखेडा येथे श्री जयराम बाबा यांची पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रामकृष्ण बाबा संस्थान बरबडा यांचे खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी बरबडा, जाटखेडा, हेलस,लिंबोना येथील ग्रामस्थ भजनात सहभागी झाले होते. मंगळवारी निवृत्ती महाराज कांगणे यांचे काल्याचे कीर्तन झाले.

यावेळी राम कृष्ण महाराज बरबडा संस्थांनचे विठ्ठल महाराज गोखुरेश्वर यांच्या हस्ते श्री जयराम बाबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे, अशोकराव वाघमारे, गणेशराव झरेकर, जगनराव घनवट, निवृत्ती गायके, आसाराम गायके, परसराम गायके यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...