आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:क्रीडा सप्ताहात घेतल्या विविध क्रीडा स्पर्धा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने क्रीडा सप्ताहांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा झाल्या.

फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन जिल्हा फुटबॉल संघटनेचे फेरोजअली मौलाना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा संघटक पी.जे चाँद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे फुटबॉल खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मोहमद शेख, राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांची उपस्थिती होती. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पांरपारिक खेळ प्रकाराचे आयोजन केले यात संगीत खुर्ची, लिंबू-चमचा,लंगोरी, लेझिम, या खेळांचा समावेश करण्यात होता.

१४ डिसेंबर कै. नानासाहेब पाटील विद्यालय, नजिक पांगरी येथे योगा, खो-खो, कबड्डी, मैदानी खेळ, १५ डिसेंबर रोजी एस.आर.पी.एफ. यांच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य राखीव पोलिस बल गट जालनाचे समादेशक दत्तात्रय पैठणे, अकबर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्रमोद खरात आदी उपस्थित होते. जेईएस व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे प्रश्नमंजूषा/ चित्रकला क्रीडा व आरोग्य, जीवनशैलीवर व्याख्यान व मार्गदर्शन करण्यात आले. १८ डिसेंबर रोजी विविध पारंपरिक व खो-खो खेळाचे आयोजन प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणी तांडा येथे करुन क्रीडा सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...