आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योग दिन:जिल्ह्यात ठिकठिकाणी योग दिनानिमित्त शिक्षक- विद्यार्थ्यांनी सादर केले योगासनांचे विविध प्रकार

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योगा दिन जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षकांनी योगाचे प्रकार, आसनाचे प्रात्यक्षिक सादर करुन योगाचे महत्व विशद केले.

दत्ताजी भाले विद्यालय

अंबड । येथील कै.दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त विविध आसने, प्राणायाम, योग साधना घेण्यात आली. गजानन उबाळे, निशा जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर घायतडक, रेखा देशमुख, लक्ष्मीकांत सामग, शाम सावंत उपस्थित होते.

न्यू हायस्कूल जाफराबाद

जाफराबाद । निरोगी तन आणि मन शांतीसाठी योग करणे हीच गुरुकिल्ली असल्याचे मुख्याध्यापक साहेबराव बोरकर यांनी सांगितले. जागतिक योगदिनानिमित्त न्यु.हायस्कुलमध्ये आयोजित योगा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आर. व्ही. मुरकुटे, एस. एम. पवार, डी. टी. गाढे, एन. बी. नवले, आर. आर. मरकड, एस. झेड. शिंगणे, यु. एस. भालेराव, जे. पी. भारंबे, एस. के. आढवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ए. डी. कोल्हे यांनी केले. वेदांत मुरकुटे, ओम मुरकुटे यांनी सर्वांगसुंदर व्यायाम, योग आणि प्राणायाम प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर केले. यावेळी अनुलोमविलोम व हास्य छटा प्राणायाम प्रयोग सादर करण्यात आले. दत्ता गाढे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

चिखली । महा एनजीओ फेडरेशन पुणे व तेजस जनविकास संस्था, चनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत चिखली येथे जगतिक योग दिनानिमित्त योग शिबिर घेण्यात आले. योग शिक्षक बाळु निकम यांनी योगासनाचे प्रकार व योगाचे महत्व सांगत प्रात्यक्षिके करुन दाखविले. शिवाजी तायडे यांनी करो योग रहो निरोग याविषयी मार्गदर्शन केले. एम.आर.रोकडे यांनी योग दिनानिमित्त एक दिवसच नव्हे तर शाळेत दररोज योगासने करण्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक शिवाजी तायडे यांनी केले. एल. बी. जुंबड यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक म्हस्के, बी. डे. टेपले, एल. बी. जुंबड, एम. आर. रोकडे, एम.आर पवार, लक्ष्मण अंबिलवादे यांच्यासह वाघ्रळ, दाभाडी, डोंगरगाव, नागठाणा, वंजारवाडी, साखरवाडी येथील विद्यार्थी उपस्थित होते.

राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल

जालना । शहरातील चौधरी नगर येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मैदानावर विविध प्रकारचे योगासने व प्राणायाम केली. यावेळी संस्थेचे अध्यक्षा रेवतीताई मांटे, प्रोफेसर डॉ. सुखदेव मांटे, प्राचार्या लतिका मनोज, वरुण अंबेकर, एलीया गायकवाड, अपर्णा भंडारे, सोनाली खंदारे, अभिजित भंडारे, रवींद्र गिरे, महेंद्रसिंग परदेशी, गिरीराज कुलकर्णी, अयोध्या पितळे, अलकनंदा घुले, वर्षा जयरंगे, रेखा शेळके, रेणुका पळसकर, शामली वानखेडे, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, गणेश कायंदे आदी उपस्थित होते.

व्ही एल डी शाळा

अंबड । आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अंबड येथील व्हीएलडी शाळेत मुलांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षिका अल्पा मोता म्हणाल्या, योगामुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होतात. अगदी शरीरातील बद्धकोष्ठता, साखर यांच्यासारखे आजार दूर होतात. मनाला आवश्यक असलेली मनःशांती आणि उत्तम आरोग्य फक्त योगामुळे मिळते. यावेळी संस्थापक सुरेश धरमशी, मुख्याध्यापिका गितल धरमशी, वितेश धरमशी, हिना धरमशी यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

मत्स्योदरी अभियांत्रिकी

जालना । मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिन्ग अंबडचे योग प्रशिक्षक फिरोजखान पठाण यांनी वॉर्मअप घेऊन विविध प्राणायाम व योगाचे आसन शिकविले. जसे की वृक्षासन, ताडासन, नौकासन, भुजंगासन, त्रिकोणासन, पश्चिमोत्तासन, इत्यादी आसन व अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका , इत्यादी प्राणायाम सुद्धा शिकवले. यानंतर सर्वांकडून नियमित योगा व प्राणायाम करेल अशी प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्राचार्य डॉ. शांतीसागर बिरादार, उपप्राचार्य प्रा.रवींद्र करवंदे, शाम भोजने, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. शेषनारायण घुंगरड, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.पंकज भोयर यांनी केले.

रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल

जालना । शहरातील दि रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल मध्ये योगादिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक मेघावाले यांच्यासह सहशिक्षिका आदींची उपस्थिती होती.

खोमणे महाविद्यालय

जालना । येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात प्रा.चंद्ररेखा गोस्वामी यांनी विद्यार्थ्याना योग दिनाचे महत्व समजावून सांगितले. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. तसेच शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. गजानन कदम, स्वाती पुराणिक, सुमित्रा खोतकर, विठ्ठल झारखंडे, ऋषिकेश अंभोरे, भगवान भुतेकर उपस्थित होते.

तीर्थपुरीत योगदिन

तीर्थपुरी । जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त तीर्थपुरी शहरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये मत्स्योदरी विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, कै.शिवाजीराव पाटील पवार इंग्लिश स्कूल, जायकवाडी प्रा. शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

सिध्दार्थ महाविद्यालय

जाफराबाद । येथील सिध्दार्थ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर घेण्यात आले. योगशिक्षिका प्रिया बिबे यांनी मानवाच्या आरोग्य व मनशांतीसाठी योग किती महत्वपूर्ण आहे हे सांगितले. शिबिरात विविध योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिक करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुनिल मेढे, प्रा. विनोद हिवराळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय साळवे, प्रा. डॉ. र. तु. देशमुख, प्रा. कैलास पाटील, डॉ. मोरे, प्रा. मनिष बनकर, प्रा. एस. डी. पैठणे, प्रा. बाविस्कर, प्रा. चौधरी, प्रा. एम. सी. मोहीते, प्रा. एन. बी. खांडेभराड, संदीप जाधव, हिवाळे, चौधरी यांच्यासह रासेयोचे स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय साळवे यांनी तर प्रा. उदय वझरकर यांनी आभार मानले.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी योगा गरजेचा

जालना । आजच युग हे धावपळीच आहे त्यामुळे त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होताना दिसून येतो. यातून जर बाहेर पडण्यासाठी जीवनात योग्य आहार व योगाचा मेळ घातला तर मानवाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ अबाधित राहील असे प्रतिपादन मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी केले.अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या वतीने डॉ. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हल्लीच्या युगात अनेक कारणांनी आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत असून, आरोग्य बिघडून अनेक व्याधी जडत आहेत. यामधून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी दररोज योगा करावा असे आवाहन गायकवाड यांनी केले. पतंजली योग समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेटे यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून योगाचे महत्व पटवून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. रमेश भुतेकर, डॉ. सुरेंद्र पडगलवार, डॉ. संजय शेळके, डॉ. मसूद अन्सारी, डॉ. सीमा निकाळजे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अविनाश भालेराव यांनी तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भुजंग डावकर यांनी आभार मानले. शांतिनिकेतन विद्या मंदिर

जालना । येथील शांतिनिकेतन विद्यामंदीरात योग शिक्षिका निशा उबरहंडे यांनी सुक्ष्म व्यायाम, श्वासाची संबंधित व्यायामाचे प्रकार, योगासने, प्राणायामचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. नादब्रह्म योगसाधना

परतूर । सध्या जगात सर्वत्र युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे. धर्म, जात, पंथ, राष्ट्र यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहेत. अशा अभूतपूर्व अशांततेच्या काळात भारतीय योग विद्या जगाला तारून नेऊ शकते असे प्रतिपादन योगाचार्य डॉ. दीपक दिरंगे पाटील यांनी केले. जागतिक योग दिनानिमित्त नादब्रह्म योग साधना केंद्र,परतूर व सेवा साधना गुरूकुल,रोहिणा यांच्या वतीने आयोजित योग शिबिरात ते बोलत होते. प्रारंभी महर्षी पतंजलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संचालक गंगाराम बहाड, सुरेश बहाड, भाऊसाहेब ठुबे आदी उपस्थित होते. शिबिरात डॉ. दिरंगे यांनी योग, प्राणायाम, ध्यान आदी योगिक प्रक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखवून उपस्थियांना यात सहभागी करून घेतले. सुरेश बहाड यांनी आभार मानले. पतंजली योग समिती

जालना । पतंजली योग समिती, शाखा- योगभूमी परिवारातर्फे ज्वाला लाँन, महेश भवनसमोर, मंठा रोड, जालना येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ७दिवसीय शिबिरामध्ये जालना शहरातील उद्योगपतीसह योगप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला. हस्तपोखरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

अंबड । तालुक्यातील हस्तपोखरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगशिक्षक गजानन पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कांगणे, आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे, डॉ. प्रसाद काकडे, अरूण मुकणे, डॉ.मुरलीधर जाधव, समुदाय अधिकारी डॉ. अरूणराव घुले, मुख्याध्यापक सुभाष हर्षे , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव गाढे आदी उपस्थित होते. यावेळी सूक्ष्म हालचाली, प्रार्थना, प्रार्थनेचे महत्व, सूर्य नमस्कार, त्यांचे बारा प्रकार मंत्रोच्चारात, पवन मुक्ता सन, मत्स्यासन, द्रोणासान, सर्वांगासन, वृक्षासन, पर्वतासन, ताडा सन,त्रिकोनासन, वक्रासन, आदी आसने घेण्यात येऊन त्यांची व्याख्या, निषेध, कृती, लाभ, फायदे, दक्षता आदींची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...