आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:वैद्यकीय पूर्व परीक्षेत वर्षा पंडित हिने 610 गुणांसह मिळवले भरीव यश

टेंभुर्णी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील वर्षा पंडीत ने वैद्यकीय पूर्व परीक्षेत ६१० गुण मिळवुन जाफराबाद तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वर्षा हिचे वडील शेतकरी असून घरची परिस्थिती ही बेताची आहे. तिचे प्राथमिक शिक्षण देळेगव्हाण च्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण जयभवानी विद्या मंदिर येथे झालेले आहे. वर्षा ही अभ्यासासह खेळ, सामान्य ज्ञान आणि वक्तृत्वात ही अव्वल होती.

तिच्या यशाबद्दल तिचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन विनोद कळंबे, प्रा. अरुण आहेर, रमेश बनकर, लंबे, आयसीसी क्लासेस चे प्रा. फुके, प्रा. पाचरणे आदींची उपस्थिती होती. अभ्यासात सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळते असे यावेळी कु वर्षा म्हणाली. तिच्या या यशाबद्दल तिचा सोमवारी जयभवानी विद्या मंदिर येथे प्राचार्य ज्ञानेश्वर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.देळेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत देखील तिचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याचे प्रल्हाद काळे यांनी सांगीतले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करणाऱ्यासाठी वर्षा चे यश एक उत्तम उदाहरण असल्याचे विनोद कळंबे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...