आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुणालाही उपदेश देणे हे फार सोप असले तरी तो पाळणे फार कठीण आहे. त्यामुळे उपदेश देण्याची कला ही सर्वांच्याच अंगी आहे, असं नाही. भगवती सुत्रात देखील उपदेशाबद्दल माहिती सांगितली आहे. त्याचे पालन हे आपापल्या परीने केले पाहिजे, असा हितोपदेश डॉ. गौतममुनिजी मसा यांनी केला.गुरु गणेशनगरमधील तपोधाममध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर यावेळी दर्शनप्रभाजी मसा, गुलाबकंवरजी मसा, हर्षिताजी मसा आदींची उपस्थिती होती. डॉ. गौतममुनिजी म्हणाले की, भगवती सुत्रातील ऐकणे या विषयावर चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. ऐकून घेण्याची सवय अंगी असली पाहिजे. केवळ उपदेशाचे डोस पाजत राहणे योग्य नाही. ऐकून घेण्याची तयारी नसतांना केवळ उपदेश देणे हे बरोबर नाही. मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवती सुत्रात सांगितल्याप्रमाणे ऐकून घेण्याची तयारी असली पाहिजे. केवळ उपदेशाचे डोस पाजत राहणे योग्य नाही.
अगोदर पूर्ण ऐकून घेतल्यानंतरच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. वाणीचं ऐकणं हा देखील मोक्ष प्राप्तीचा गुण आहे. शिवाय मनुष्याचं आचारण देखील शुध्द असलं पाहिजे.आचरण अशुध्द ठेवणं हे बरोबर नाही. जे चांगलं ऐकत नाहीत आणि उपदेश मात्र करतात अशी व्यक्ती कधीही मोक्ष प्राप्त करु शकत नाही, जशी आई तस अपत्य असतं. जिनवाणीचं रसपान करता आलं पाहिजे. जिनवाणीचं श्रवण हा देखील भक्ती मार्गच आहे. वैभवमुनिजी मसा यांनी सांगितले, पूर्वी राजा आणि राणीचे राज्य चालत असायचे. आज ती पध्दत राहिली नसली तरी राजा- राणीच्या कर्तृत्वाबद्दल मात्र जे सांगितलं जातं ते ऐकून मन सुन्न झाल्याशिवाय राहात नाही. जी दासी चांगली बातमी देईल तीला बक्षीस देण्याची प्रथा होती. खाली हाताने दासीला जाऊ देत नसत. ती प्रथा आज राहिली नाही.मात्र जे सत्य आहे, त्याला नाकारता येत नाही. राणीला पुत्र रत्न प्राप्त झाल्याची बातमी जेव्हा दासीने राजाला दिली तेव्हा राजवाड्यातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं. ही बातमी ऐकल्यानंतर राजाने दासीला खूश करुन टाकलं. अनेक प्रकारच्या मोहरा देण्यात आल्या. राजवाड्यात आनंदी आनंद पसरला. आता मुलावर चांगले संस्कार पडावेत म्हणून तसा प्रयत्न राजाने केला.
आजकाल तर मुलांवर चांगले संस्कार असतीलच असे नाही, असे सांगून ते म्हणाले की, मुलांला चांगले संस्कार लागावेत म्हणून त्याला चांगल्या शाळेत टाकले जायचे. पूर्वी गुरुकुल होते. त्यातून मुलांवर संस्कार टाकले जायचे. आजची शाळा नव्हती. आज तर मुलंच गुरुजींना व्यवसनाच्या बाता मारतात, परंतू गुरुजींची त्यांना धाक लावण्याची किंवा मार देण्याची हिंमत होत नाही. कारण दिसत बदलले आहेत. पूर्वी मात्र असे नव्हते. गुरुकुलातील गुरुंनी मुलांना मारहाण केली तरी आई- वडीलांना त्याचे काहीच वाटत नव्हते. आणि मुलं तरी वर्गात काय झाले हे सांगत नव्हती. मुलांवर चांगले संस्कार असायला हवेत, असे गुरुंना हमेशा वाटत राहचे. त्यावेळी नालंदासारखी विद्यापीठे सुध्दा होती. मुलगा सोळा वर्षाचा होईपर्यंत त्याच्या संस्कार केले जायचे. उत्तम मार्गदर्शन केले तर मुलं चांगली सुधारतात. त्यांच्याच चांगलाच बदल दिसून येत होता. यावेळी श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे आजी- माजी पदाधिकारी, श्रावक- श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.