आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयाच्या परिसरात सेंद्रिय पद्धतीवर लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुट प्रकल्पास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी भेट दिली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की. तीर्थपुरीतील या महाविद्यालयास भेट देण्याचा योग आला. या ग्रामीण भागातील महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या पडीत जमिनीमध्ये ड्रॅगन फूड प्रकल्प घेण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम बघून त्यांनी आनंद व्यक्त केला. . शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सर्वांना प्रेरणा देणारा हा उपक्रम होय सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.
महाविद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन करताना सदर उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सामाविष्ट करून त्यांना सुद्धा अशा अभिनव प्रयोगासाठी प्रेरित करावे. या कार्यक्रमाच्या वेळी प्र. कुलगुरू डॉ. शाम शिरसाट, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, संस्थेचे विश्वस्त समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार डॉ. काळे, ज्ञानोबा मुळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानसिंग बैनाडे, डॉ.शिवराज लाखे, डॉ.सुनील खांडेभराड, उपस्थित होते.
दरम्यान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ड्रॅगनफ्रुट बागेचे व्यवस्थापन, विक्री,पाण्याचे नियोजन, लागवडीखालील क्षेत्र याविषयी माहिती जाणून घेतली व असे नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यापीठात देखील राबविले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमसाठी डॉ. अंकुश चव्हाण, प्रा. रमेश जोगदंड, डॉ. प्रदीप लगड, डॉ. प्रदीप जाधव, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.