आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:युवा सेनेच्या सहसचिवपदी विनायक चोथेंची नियुक्ती

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा अंबड नागरी सहकारी पंतसंस्थेचे संचालक विनायक चोथे यांची शिवसेनेमध्ये युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील गेल्या ५ वर्षांपासून विनायक चोथे हे समाजकारणासह सक्रित राजकारण शिव सेना पक्षाचे काम करत असून वेळोवेळी त्यांनी अनेक अंदोलनाने, समाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तरून वर्गाची फळी उभारण्याचे काम केले.

सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांची नियुक्ती युवासेनच्या राज्य कार्यकारणीसह सचिव पदावर केली. या नियुक्तीबद्दल चोथे यांनी वरूण सरदेसाई, अमोल कीर्तीकर, रूपेश कदम, मयुर कांबळे, विपुल पिंगळे, ऋषी खैरे आदींचे आभार मानले असून संघटन वाढीसाठी जोमाने काम करणार असल्याची भावना व्यक्त केली. या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...