आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनात सहभाग:शिष्यवृत्ती रद्द झाल्याबद्दल तीव्र निषेध

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्याविरोधात अल्पसंख्याक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. जालन्यात महाराष्ट्र अल्पसंख्याक शिक्षण सोसायटी व उर्दू शिक्षक संघटनेकडून सरकारच्या या निर्णयाचा आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांना गणवेश घेणे, प्रवेश शुल्क भरणे हे देखील कठीण आहे. जालना जिल्ह्यात जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेशसुद्धा मिळत नाही. त्यात सरकार अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या अनेक योजना बंद करत आहे. याचा आम्ही निषेध करीत असून शुक्रवारी होत असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. यसा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे येथील उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद इफतेखारोद्दीन यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...