आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदाला जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत सरपंच व गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट देऊन गावातील विविध विकास कामांची पाहणी केली. दरम्यान आपल्याही गावात हा उपक्रम राबविण्यासाठी गावातील विविध सोयींची आपण पाहणी केल्याचे सरपंच प्रतिनिधी गौतम मस्के यांनी सांगितले.
कर वसुली हा विकास कामासाठीचा आत्मा असल्याने गावात विकासाचे जाळे पोहोचवायचे असल्यास कर वसुली शंभर टक्के झाली पाहिजे असे मत पाटोदा गावचे उपसरपंच कपिंद्र तेरे यांनी सांगितले. टेंभुर्णीचे सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के माजी उपसरपंच राजू खोत, ग्रामपंचायत सदस्य धनराज देशमुख, भाजप नेते भिकन पठाण, ज्ञानेश्वर उखर्डे, अलकेश सोमानी, संजय राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी पाटोदा ग्रामपंचायतचे कर्मचारी पेरे यांनी गावात राबविलेल्या पिठाची गिरणी, गरम पाण्याचा प्लांट, थंड पाण्याचा प्लांट, सांडपाण्याची व्यवस्थापन, वृक्ष लागवड, गावाला मिळालेले पुरस्कार या संदर्भात माहिती दिली. गावातील सुख सुविधांसाठी गाव पातळीवर कराच्या माध्यमातून येणाऱ्या ग्रामनिधी हा विकासासाठी चा महत्त्वाचा भाग आहे.
यामुळे ज्या गावात वसुलीचे प्रमाण जास्त राहील त्या ठिकाणची विकास कामे वेळेत मार्गी लागतात भविष्यामध्ये शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावाचा निधी गावानेच उभारावा, असे आवाहन पेरे यांनी केले. दरम्यान, गावाच्या विकासामध्ये कर वसुलीला अत्यंत महत्त्व असून टेंभुर्णी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतचा थकलेला कर भरून विविध सुखी सोयी सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात भविष्यामध्ये टेंभुर्णी विविध उपक्रम राबविण्याचा आपला मानस असून ग्रामस्थांनी वसुली देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मस्के यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.