आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार रिंगणात:तळणीतील लढतीकडे मतदारांचे लागले लक्ष

रवी पाटील | तळणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली तळणीची निवडणुकीची सध्या सर्वञ चर्चा होत आहे. १३ ग्रामपंचायत सदस्यासाठी एकूण ५१ उमेदवारांनी नशीब आजमवण्याचे ठरवले असून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने ६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे.

एखाद्या मोठ्या निवडणूकीचा अनुभव सध्या तळणीकर घेत आहेत. दहा ते पधरा वर्षापूर्वीचा काळ बघीतला तर इतका गाजावाजा त्या काळात ग्रामस्थानी अनुभवला नाही. सध्या प्रत्येक घरी जाऊन शेतात जाऊन भेटी गाठी घेऊन आपणच कसे गावच्या विकासासाठी योग्य आहोत हे मतदाराना सांगण्याचा प्रयत्न प्रचारातून होत आहे. भाजपाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याच राजकीय पक्षाने त्याच्या बॅनर खाली निवडणुन लढवत नसून याचा कसा आणि कोणाला फायदा होतो हे लवकरच कळेल. मागच्या पंचवार्षीकला जे सोबत लढले ते आता स्वंतञ लढत देत आहे तर काही नवखे उमेदवार सुध्दा नशीब अजमवात आहेत. तळणी हे परिसरातील वीस ते पंचवीस गावातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने मोठी उलाढाल असते.

परंतू आजही अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावातील सर्वात मोठी समस्या म्हणजे सार्वजनिक स्मशानभूमी होय. जागा उपलब्ध असतानाही कायम दुर्लक्षीत आहे. ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी स्वत:च्या शेताचा वापर करावा लागतो. सार्वजनिक स्मशानभूमी झाली तर हा प्रश्न कायमचा निकाली निघु शकतो तसेच तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांला आजही कायमचा मुख्य रस्ता नाही. गेल्या पाच सात वर्षापासुन रस्त्याचे भिजत घोंगडे कायम असून आजही पिण्याच्या पाण्याच्या तीन योजना कार्यान्वीत असल्या तरी पंधरा पंधरा दिवस नळाला पाणीपुरवठा होत नाही.

गावात अनेक समस्या
बसस्थानक परिसरात कित्येक दिवसापासून पाणीपूरवठा बंदच आहे. बसस्थानक परिसरातील नव्याने झालेले पथदिवे दोन वर्षापासून बंद आहेत तर बसस्थानक परिसरात सतत कमी दाबाचा व विजेच्या लपडावाने ग्रामस्थ व व्यापारी ञस्त आहेत. विजेची मागणी वाढली तरी सुध्दा मोठया रोहिञावरुन विजपुरवठा करणे गरजेचे आहे. गावातील रोहीञावरूनच शेतीसाठी विजपूरवठा होत असल्याने रोहीञ जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...