आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:मंठा तालुक्यातील 31 ग्रामपंचायत निवडणुकीत  96 केंद्रांवर मतदान

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतच्या निवडणुका ९६ मतदान केंद्रांतून शांततेत पार पडल्या. मतदानाची सरासरी ८४.२३ % इतकी होती. एकूण १६४८१ पुरुष मतदारांपैकी १३,९६८ तर १४,६७९ स्त्री मतदारांपैकी १२,२७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ३१,१६० मतदारांपैकी २६२४६ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी ८४.२३ % इतकी होती. एका मतदान केंद्रासाठी प्रत्येकी चार कर्मचारी याप्रमाणे ३८४ कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय १० झोनल ऑफिसर आणि ११ निवडणूक निर्णय अधिकारी असे एकूण ४०५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

पोलिस निरीक्षक संजय देशमुख आणि पोलिस उपनिरीक्षक आस्मान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कक्ष कर्मचारी म्हणून संदीप उगले, श्रीनिवास जोशी, सूरज जाधव, संतोष चव्हाण, डी. बी. पंजरकर आदी काम पाहत आहेत. बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलावून मोठ्या प्रमाणात मतदान करून घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...