आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवमतदार:दानकुंवर महाविद्यालयात मतदान जागृती; नोंदणी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, रासेयो विभागातर्फे विद्यार्थिनींसाठी ‘मतदान जागृती आणि मतदार नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य प्रा. डॉ.विजय नागोरी तर उपप्राचार्या प्रा. डॉ. विद्या पटवारी, अरुण जायभाय, संदीप चव्हाण, एन. डी. इंदूरकर, आर. पी. चव्हाण, संदीप मिसाळ, प्रा. डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. सुधाकर वाघ, डॉ. झेड. बी. काझी, डॉ. स्वाती महाजन, डॉ. बी. जी. श्रीरामे आदी उपस्थित होते. ज्या विद्यार्थिनींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्या विद्यार्थिनींचे १८ वर्षे होऊ घातलेली आहेत.

त्यांच्याकडून मतदार नोंदणीसाठी म्हणून ६ नंबर फॉर्म भरून घेण्यात आला. तदनंतर अरुण जायभाय यांनी तरुण मतदार विद्यार्थिनींमध्ये मतदानासंबंधी जागृती व्हावी म्हणून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मतदार नोंदणीची प्रक्रिया समजून सांगितली.

त्यानंतर उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या पटवारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले अमूल्य मत देण्याची गरज आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. नागोरी यांनी आपले प्रत्येकाचे मत देश हितासाठी कसे महत्त्वाचे आहे. योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदार म्हणून नोंदणी करणे आणि मतदान करणेही आवश्यक आहे. असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. बी. जी. श्रीरामे यांनी तर बी. बी. खंडाळे यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...