आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:अंबड तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यात 40 ग्रा.पं.साठी मतदान

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात एकूण चाळीस ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. ७ डिसेंबरला उमेदवारी मागे घेण्याची तसेच निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठीची मुदत आहे.

अंबड तालुक्यातील साडेगाव, रामगव्हाण बु., भिवंडीबोडखा, दोदडगाव / सौंदलगाव, पिंपरखेड खुर्द, अंतरवाली सराटी, लोणार भायगाव, दादेगाव / मठतांडा, कोळीसिरसगाव, सोनक पिंपळगाव, जोगेश्वरवाडी / विठ्ठलवाडी, चिंचखेड, पिठोरी सिरसगाव, झोडेगाव, मठजळगाव, काटखेडा, डोमेगाव, वडीलासुरा / लासुरा, भणंग जळगाव, मार्डी, माळ्याचीवाडी/भोकरवाडी, धनगर पिंप्री, गंगाचिचोली / इंदलगाव, भांबेरी, बक्ष्याचीवाडी/लेभेवाडी, पागीरवाडी / नागोण्याचीवाडी, वाघलखेडा, सारंगपूर, हस्तपोखरी, वठाण खुर्द, शिराढोण / वाडीशिराढोण, जामखेड या ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होणार आहे. यंदा सरपंचपदाची जनतेतून निवड होणार असल्याने अनेकजण मोर्चेबांधणीसह चाचपणीला लागले आहेत.

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा विविध निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी ग्रामपंचायतीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. बहुतांश गावात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट या प्रमुख पक्षासह इतर पक्षाचेही कार्यकर्तेे या निवडणूकीसाठी कामाला जोमात लागले आहेत. यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...