आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:वडीगोद्री सर्कलमधील नऊ ग्रा.पं.साठी मतदान

वडीगोद्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील धाकलगाव, गोंदी, शहागड, साष्टपिंपळगाव या चार सर्कल मधील ९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला. यासाठी दिग्गजांमध्ये कमालीची चूरस निर्माण झाली आहे. मतदानाची टक्केवारी प्रमाणात वाढल्याने या निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे सांगणे खूपच कठीण झाले आहे.

सरासरी ७० टक्के दरम्यान मतदान झाले असून यावेळी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये बंद केले. आपल्या गावच्या कारभाऱ्यांची निवड करायची असल्याने यावेळी मतदारांनी जागृतपणे मतदान करण्यासाठी सकाळ पासूनच मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सर्वच पॅनेलचे सर्वच उमेदवार परीचित असल्याने व ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाल्याने मतदारांनी गावचा विकास करण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवारालाच मतदान केल्याचे सांगितले. या निवडणूकीत प्रत्येक उमेदवार ठामपणे आपल्याच विजयाचा दावा करीत आहे. मात्र, मतदारांशी संवाद साधला असता निकाल धक्कादायक लागणार असून मतदार सुज्ञ झाला असल्याचे एका वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीकाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...