आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:घनसावंगी तालुक्यामधील 34 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

कुंभार पिंपळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील चित्र बदलणारी ग्रामपंचायतीची निवडणूक मतदान प्रक्रिया रविवारी होत आहे. प्रत्येक पॅनल मतदानाच्या दिवशी आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मते पाडून घेण्यासाठी उमेदवारांची आटापिटा करीत आहेत. १६ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावल्याने मतदानाच्या दिवशी छुप्या भेटीगाठींना जोर येणार असल्याचे दिसत आहे.

घनसावंगी तालुक्यातील मुदत संपलेल्या ९७ पैकी ३४ ग्रामपंचायती निवडणूक मतदान प्रक्रिया होत आहे. सदस्य किंवा सरपंच पद हे केवळ मानाचे नाही तर पंचवार्षिक मध्ये विकास कामाचे पद झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभा व सार्वजनिक ठिकाणी चौकसभा घेऊन फेरी काढता आली नाही. शिवाय गाव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, सुरत, नाशिक, औरंगाबाद आदी मोठ्या गावी गेलेल्या त्या मतदार राजाचा शोध घेताना उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.

यंदा थेट जनतेतून सरपंचासाठी निवडणूक होत असल्याने सरपंचपदाचे उमेदवार मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध क्लुत्या करीत आहेत. आमदार राजेश टोपे आणि समृद्धी समूहाचे चेअरमन सतीश घाडगे यांनी आपापले समर्थक कसे विजय होतील यासाठी गावागावात भेटी दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान पथके, ईव्हीएम सह मतदान साहित्य घेऊन शनिवारी नेमून दिलेल्या आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. ११७ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. शिवाय सदर निवडणूक भयमुक्त व शांततेत पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तहसील प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

१९ पुरावे आवश्यक
आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आदी प्रकारचे पुरावे देऊन केंद्र अध्यक्षास ओळख समाधानकारक रित्या पटेल असे या १९ पुराव्यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची ओळख दाखवून मतदार राजा मतदान करता येईल. असे राज्य निवडणूक आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक व्होटर अॅपचा वापर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलिसांनी सुद्धा विशेष बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत व्होटर ॲपचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राची माहिती निवडणूक निवार्चन अधिकारी व तहसीलदारांना कळण्यास मदत होऊन कामात सुलभता येईल.
संदीप मोरे, नायब तहसीलदार, घनसावंगी

ग्रामपंचायत तिजोरीत लाखोंचा कर जमा
ग्रामपंचायतीच्या थकबाकी साठी उमेदवारी अर्ज बाद केला जाण्याची शक्यता असते म्हणून ते टाळण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच चालू व थकीत कराचा भरणा केला आहे. तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीच्या तिजोरीत लाखाच्यावर रक्कम जमा झाली असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...