आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:वरूड बु. सभामंडप जागा प्रश्नी नाभीक‎ समाजाचे तहसिलदारांना निवेदन‎

वरूड बु.2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील वरुड बु येथील‎ नाभिक समाजाच्या सभामंडपसाठी वार्ड क्रमांक ४‎ येथील जागा देण्यात आलेली आहे. परंतु या जागेवर‎ संबंधित व्यतीचा ताबा आहे. तो ताबा सोडविण्यासाठी‎ गावची ग्रामपंचायत असमर्थ ठरत आहे. गावचे‎ नागरिक पुरुषोत्तम गिरी यांनी त्यावर खासगी ताबा‎ घेतला आहे. या विषयी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार‎ करूनही ते या जागेचा प्रश्न मार्गी लावत नाहीये व‎ उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

त्यामुळे ६ फेब्रुवारी‎ रोजी जाफ्राबाद येथे तहसीलदार साहेबांना निवेदन‎ देण्यात आले. यावेळी विजय बोराडे, विठ्ठल वाघमारे,‎ संतोष वाघमारे, जितेंद्र वाघमारे, नीलेश वाघमारे,‎ शुभम बोराडे, रवींद्र वाघमारे, सचिन वाघमारे, गणेश‎ वाघमारे, अमोल वाघमारे, मंगेश वाघमारे, शंकर‎ वाघमारे व समस्त नाभिक समाजबांधव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...