आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:कायमस्वरूपी योजना नसल्याने दाभाडी येथे पाण्याची टंचाई; ग्रामस्थांची भटकंती

चिखली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे पाणी पुरवठा योजनेवर मागील तीस वर्षापासून शासनाने कोटयवधी रुपये खर्च केले परंतू कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने गावात आजही पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.

प्रत्येक पंचवार्षिकमध्ये निवडून आलेल्या सरपंचानी पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्न केले मात्र जवळपास कोठेही पाणी नसल्याने अडचणी येत आहेत. शासनाच्या निधीतुन पाणीपुरवठा योजनेसाठी पाच ते सहा विहिरी खोदण्यात आल्या मात्र अद्याप एकही विहीर दाभाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम झाली नाही. सद्यस्थितीत पळसखेडा येथील तलावाच्या काठावरील एका विहिरीमधुन मार्च महिन्यानंतर पाणीपुरवठा केला जातो. मात्र तोपर्यंत गावाच्या पश्चिमेला एक छोटासा तलाव आहे त्या तलावातील विहिरीमधुन आठ ते दहा महिने गावाला पाणी पुरवठा होतो. मार्चनंतर ही विहीर कोरडी ठाक होते.

पळसखेडा येथील विहीर २०२० मध्ये धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण केल्याने पाणीपुरवठ्याची विहीर पुर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. परंतू तलावातून थेट येणारे पाणी ग्रामस्थांना वापरासाठी उपयोगात आणावे लागते. पिण्यासाठी मात्र खासगी टॅँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. दरम्यान, पाणीपुरवठयासाठी १ कोटी ४२ लाख रुपये मंजुर झाले असुन या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच टेंडर निघून पाणीपुरवठ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या योजनेत एक जलकुंभ, पाईपलाईन, विहीर व गावात मुख्य रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे सरपंच गुलफिशा अदनान सौदागर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...