आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्न पेटला:पाणीटंचाई सुरू, नदीपात्रात पाणी सोडा - तोंडोळी ग्रामस्थ कालव्याचे काम अपूर्ण, पाणी सोडू नका - पळसखेडा

श्रीक्षेत्र राजूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाणेगाव मध्यम प्रकल्प भागवतोय १५ गावांची तहान, कालव्याचे काम अपूर्ण असल्याने होतोय अपव्यय

बाणेगाव मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यातून परिसरातील १५ गावांना पाणीपुरवठा होतो. या मध्यम प्रकल्पातून नदीपात्राद्वारे पाणी सोडण्यात येऊन ग्रामस्थांची पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी तोंडोळी, गव्हाण संगमेश्वर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. तर अपूर्ण कालव्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रकल्पातील पाणी सोडू नये, अशी भूमिका पळसखेडा येथील नागरिकांनी घेतलेली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. तहसीलदार यांच्या आदेशानुसार लघु पाटबंधारे विभागाने २ एप्रिल रोजी पोलिस बंदोबस्तात बाणेगाव मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले होते. मात्र, पाणी सोडण्यास विरोध झाला आहे.

बाणेगाव मध्यम प्रकल्प पावसाळ्यात तुडुंब भरला होता. या मध्यम प्रकल्पात राजूर, बरंजळा, देऊळगाव ताड, खामखेडा, लोणगाव आदीसह १५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या प्रकल्पाच्या पाण्यावरच परिसरातील ग्रामस्थांची तहान भागते. या प्रकल्पातून इतर ठिकाणी सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्याचे काम अपूर्ण आहे. अपूर्ण कालव्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तोंडोळी व गव्हाण संगमेश्वर या दोन गावांतील पाणीटंचाई दूर होण्यासाठी बाणेगाव मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, यामुळे नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी वाढली जाते. आणि ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा होतो, अशी मागणी या गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

मात्र, कालव्याचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडू नये, पाणी सोडल्यास पाण्याचा अपव्यय होत असून, पाण्याची नासाडी होते, अगोदर कालव्याचे काम पूर्ण करा, नंतरच पाणी सोडा, अशी मागणी पळसखेडा येथील नागरिकांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. परंतु पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या, त्यानुसार तहसीलदार यांनी लघु पाटबंधारे विभागाला पोलिस बंदोबस्त देऊन २ एप्रिल रोजी गव्हाण संगमेश्वर व तोंडोळी गावांना नदीपात्राद्वारे पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाणी सोडण्यास विरोध होऊन दोन तासांनंतर पाणी बंद करण्यात आले. बाणेगाव मध्यम प्रकल्पातील पाण्यावरून तीन गावांत वाद पेटला आहे.

कालव्याचे काम अर्धवट : बाणेगाव येथील मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम अपूर्ण आहे. कालवा अपूर्ण असल्यामुळे पाणी सोडता येत नाही. मात्र, पाण्याअभावी तोडोळी, गव्हाण संगमेश्वर व इतर गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पाण्याचा वाद मिटवावा, सर्वसामान्य नागरिकांचा त्रास दूर करावा, अशी मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...