आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:धावडा गावात पाणीटंचाई, वीस दिवसांआड होतोय पाणीपुरवठा ; जलकुंभ भरण्यास आठ दिवस लागत आहे

धावडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खूप जुनी असल्याने जागोजागी गळती लागलेली आहे. त्यामुळे पाणीपुरवठयात वारंवार व्यत्यय येत आहे. परिणामी गावात २० दिवसाआड पाणी येते. धावडा गावाला धामणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. जवळपास आठ किलोमिटर पाइपलाइन करण्यात आलेली आहे. पाइपलाइन जुनी असल्याने वारंवार फुटून पाणी वाया जात असल्याने येथील जलकुंभ भरण्यास आठ दिवस लागत आहे. गावातील नळ संख्या जास्त असल्याने चार वेळा गावात व दोन वेळा झोपडपट्टी समतानगर भागात पाणी सोडावे लागत असल्याने ग्रामस्थांची भटकंती होते. ग्रामपंचायत सदस्य ईश्वर सपकाळ यांनी वार्ड क्रमांक एक मध्ये व उपसरपंच ईकबाल पठाण यांनी वार्ड क्रमांक ३ मध्ये असे आपापल्या वॉर्डात ३ जून पासून टॅंकरने जनतेस मोफत पाणी वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सरपंच विलास महाराज, उपसरपंच ईकबाल पठाण, माजी सरपंच बेल्लाअप्पा पिसोळे, डॉ. प्रमोद कुलकर्णी, दिनेश देवकर, दिलीप वाघ, रामराव पवार, धनंजय तबडे, समाधान सुडके, सय्यद करीम, भागवत बोराडे, साजीद पठाण, देविदास शेजवळ, सय्यद इक्बाल, शेख नईम, इम्रान भांजा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...