आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:भोकरदन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; सुरळीत पाणीपुरवठयासाठी भाजप महिला शहर आघाडीचे आंदोलन

भोकरदन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तातडीने दुरुस्त करा, अन्यथा नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा महिला शहर आघाडीने दिला आहे.

नगर परिषदेचे प्रशासक अतुल चोरमारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मागील सहा महिन्यापासून नादुरुस्त आहे. सदर प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी यांना वारंवार भेटून जलवाहिनी दुरुस्त करणेसंदर्भात विनंती केली होती.

परंतु त्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळे शहरवासीयांचा गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असून साथीच्या आजाराने शहरामध्ये थैमान घातले आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर पाइपलाइन दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत नाइलाजाने शहरवासीयांना दुषित पाणी प्यावे लागेल.

त्यामुळे शहरवासीयांना साथीच्या अजारांना सामोरे जावे लागेल. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने चालू करून पूर्ण करावे, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्षा आशा माळी, संध्या शर्मा यांच्यासह नगरसेवक, राहुल ठाकूर, दिपक बोर्डे, रणविर देशमुख, दीपक तळेकर, राजेश जोशी, शंकर सपकाळ, गंगाधर कांबळे, राजेंद्र दारुंटे, सुनिल देशपांडे, सुरेश बनकर, राजु सुलताने, नारायण तळेकर, ज्ञानेश्वर तळेकर, किरण देशपांडे, रामदास पाथरे, कैलास मव्हारे, जफरसेट, वाहीदखा, शे. तौसिफ, दीपक राठी, सुमीत थारेवाल, कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...