आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटिबद्ध:शहर सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध : गोरंट्याल

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार कैलास गोरंट्याल यांनी येथे केले. शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील ट्रिमिक्स रस्त्याच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विनाताई सामलेटी, सोनु सामलेटी, अशोक भगत यांची उपस्थिती होती. आमदार गोरंट्याल म्हणाले की, जवळपास सर्व प्रमुख रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बागडी कॉम्प्लेक्स पर्यंतचा रस्ता पुर्ण झाला की रामनगर भागाच्या वैभवात भर पडणार आहे.

याप्रसंगी सोनु सामलेट यांनी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल व युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्त्वाखाली व विशेष सहकार्याने या रस्त्याच्या काम होत असल्याचे सांगितले. यावेळी आरेफ खान, संतोष माधोले, बाळु रोडे, लखण चौधरी, संजय भगत, रॉबिन कमाने, संतोष झारखंडे, राजु हतागळे, संजय पाखरे, सचिन झारखंडे, विलास जगधने, लतीफ शेख, दत्ता पाटील, बापू साळवे, कल्याण जाधव, संजय दाभाडे, दावीद गायकवाड, अजय कसबे, अजय जगधने, सौरभ जगधने, धरम सोनवणे, विशाल वाहुळे, इब्बा भाई, धर्मप्रसाद गंगुल, विजय चव्हाण, गोपाल चौधरी, भरत भुरेवाल आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...