आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:थोर महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करावी; रामेश्वरचे साखर कारखान्याचे चेअरमन विजयनाना परिहार यांचे प्रतिपादन

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराणा प्रताप म्हणजे अतुलनीय साहस व पराक्रमाचा शुर स्वाभिमानी राजा होते, थोर महापुरुषांनी साधु संतानी सांगितलेल्या मार्गाने सर्वानी वाटचाल करावी त्यांनी सांगितलेले विचार आत्मसात करुन आपले यशस्वी जीवन जगावे असे रामेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन विजय परिहार यांनी सांगितले.

जाफराबादेत महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तत्कालीन भारतात हिंदू शासनकर्त्या मध्ये राजपूत, मराठा इत्यादी घराणे नेटाने परकीय आक्रमणाबरोबर लढत होते महाराणा प्रताप बालपणीच दृढ निश्चयी व कुशाग्र बुध्दीचे असल्याचे दिसुन आल्याने ते भविष्यात काहीतरी यशा संपादन करतील याचा अंदाज जानकारांना आला होता व पुढे हळुहळु त्यांची मातृभूमीप्रती निष्ठा, साहस, अद्भुत शौर्य व अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची झुंजार वृत्ती त्याचा पराक्रम पाहुन दिसुन आली म्हणुन प्रत्येक भारतीय त्यांच्या पराक्रमाला नमन केल्याशिवाय राहत नाही.

त्याचप्रमाणे या मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्रत्येक धर्म तथा जातीत महापुरुषांनी जन्म घेऊन देशाचे संरक्षण केले आहे. त्यांच्या पराक्रमामुळेच आम्ही स्वातंत्र्य होवुन इथे मोकळा श्वास घेत आहोत. म्हणुन यावेळी यावेळी नितिनसिंह गौतम, प्रा.राजपुत, संदिप सोळंके, बिजेसिंह परीहार, राजेंद्रसिह गौतम, सचिन गौतम, देविसिंह बायस, चेतन बायस, विश्वजित गौतम, पंढरीनाथ परीहार, सुभाष परिहार, आकाश गौतम, सौगंधसिंह बायस, मंगेश ठाकुर, राकेश वाकडे, ओम गौतम, कुलदिप बायस, रुषी बर्हाटे, उमेश ढाकीफळे, अक्षय मुळे, ओम दुबे, विलास भाग्यवंत, अशोक राऊत, मरकड आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...