आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञान महत्वाचेच व त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण त्याला सद्गुणांची जोड ही अत्यंत महत्त्वाची आहे. महापुरुषांनी आपल्या प्रगतीसाठी ज्ञानाचे महत्त्व वारंवार आधोरेखितरित केले आहे पण समाज हा ज्ञानाबरोबरच व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या चांगल्या गुणांमुुळे प्रभावित होतो. ज्ञानामुुळे अनेकजण उच्चपदस्थ अधिकारी होतात पण ते जनतेबरोबर चांगले वागतात तेच लोकप्रिय होतात. हा त्यांच्या गुणांचाच प्रभाव असतो. असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी सांगितले. जालना शहरातील नागोजीराव सतकर प्राथमिक शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय आघाडीच्यावतीने विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र पुरस्काचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष बाबुराव सतकर, डॉ. राजेश राऊत, राजकुमार दवंडे, प्रकाश बुधवंत यांची उपस्थिती होती. अंबेकर म्हणाले, प्रचंड ज्ञान असूनही जर त्याचा उपयोग समाजाला होत नसेल तर ते ज्ञान कुचकामी आहे. समाजाजात कसे वागावे, बोलावे हे कळले पाहिजे. आपल्या ज्ञान उपयोग समाजाला झाला पाहिजे तरच समाज आपला आदर करील. अनेकांना ज्ञानाचा, पदाचा अहंकार असतो अशी माणसं समाजाला नकोशी वाटतात. तर आदर, समर्पण, नम्रता, परिश्रम, जिद्द, चिकाटी असे गुण अंगी असतील तर समाज नक्कीच आपला आदर करील. आमच्या राजकीय क्षेत्रातही एखादी निवडणूक जिंकल्याने नव्हे तर आपल्या कर्तृत्व व सद्गुणामुळेच पुढे त्यांची ओळख राहत असल्याचे सांगितले.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ज्ञानाबरोबरच उत्तम गुणांचेही संस्कार केले. त्यामुुळेच एकटे छत्रपती शिवाजी महाराज आजही रयतेचे जाणते राजे म्हणून लोकप्रिय आहेत व महाराजांच्या सद्गुणांचे अनेकप्रसंग आजही ऐकावयास मिळतात. यावेळी माया कांबळे, अॅड. रेखा कांबळे, कविता दाभाडे यांच्यासह मुुख्याध्यापिका ठाकरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.