आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील ग्रामस्थ रविवारपासून उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने शनिवारी पुन्हा सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढू, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात चर्चेसाठी पाठवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थ उपोषणावर ठाम असून रविवारपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे.
वडीकाळ्या गावातील शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार झाली. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. यात सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, पण ठोस निर्णय झाला नाही. या चर्चेची माहिती आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी सोमवारी एक मंत्र्यांचे शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात आंदोलन ठिकाणी येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे आदींची उपस्थिती होती.
या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणावर नक्कीच मार्ग काढू. मराठा आरक्षणासह कोपर्डी खटला, सारथी संस्था, मराठा विद्यार्थ्यांसाठी होस्टेल अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे, फक्त ठोस निर्णय कोणकोणते झाले यावर सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन चर्चा करून सांगणार आहे. मात्र वडीकाळ्या गावातील बेमुदत उपाेषण सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.