आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपुर्ण राज्यात तळा-गाळापर्यंत भारतीय जैन संघटनेच्या महाराष्ट्रात संघटना बळकट करु, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी सांगितले.ल भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी हस्तीमल बंब यांची फेरनिवड संस्थापक शांतिलाल मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष राजेन्द्र लुंकड यांनी केली. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्ऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी ते बोलत होते. प्रारंभी सामुहिक नमस्कार महामंत्र पठन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना बंब म्हणाले, मागील ३५ वर्षापासुन गांव अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, राज्य अध्यक्ष त्याच बरोबर राजस्थान, आंध्रप्रदेश च्या गावा-गावात जाऊन संघटनेची बांधणी केली आहे. नियमित संपर्क दौरे, वधु-वर मेळावा, विधवा, तलाकशुदा, दिनदुःखींचा पुर्नविवाह, भुकंपग्रस्त, पुरग्रस्त यांना सहाय्य करणे, आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या, कोव्हिड मुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण, कोरोनाच्या संकटात फिरता दवाखाना, ऑक्सिजन बँक, रक्तदान शिबीरे अनेक मानवीय सेवेच्या उपक्रमात महाराष्ट्र आघाडीवर आहे. केलेल्या कार्याची पावती म्हणून तिसऱ्यांदा माझ्यावर महाराष्ट्राची धुरा संभालण्याची जवाबदारी टाकलेली आहे. राज्यात जलसंधारण, मुलींचे सक्षमीकरण, मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. यास महाराष्ट्रात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात जवळ-पास ७०० महिला-पुरुष शाखा कार्यरत आहे. लवकरच संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक शहरात / गावात अध्यक्ष, कार्यकारिणीची फेर निवड करु. संपुर्ण राज्यात विशेष करून ग्रामीण भागात तळा-गळापर्यंत संघटना बळकट करु, गरजुंना संघटनेच्या योजनेचे लाभ मिळवून देऊ. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ. तरुण नवीन पिढीने सामाजिक कार्यात पुढे यावे. सुन-मुली, महिलांच्या सुरक्षाच्या उपक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात / गावात महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला शाखा उघडु समाजाच्या विकासासाठी विधायक कामावर भर देण्यात येईल. निःस्वार्थ भावनाने मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवु. जैनांचा विश्वास, देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे, असे शेवटी हस्तीमल बंब म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. अभय सेठिया यांनी तर अजय पहाडे यांनी आभार मानले.यावेळी भारतीय जैन संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष दिनेश राका, संतोष मुथ्था, नरेन्द्र मोदी, विजय सुराणा, अजय पहाडे, पवन सेठिया, धनराज जैन यांच्यासह राजेश बाठिया, कैलास लुंगाडे, चेतन देसरडा, ताराचंद कुचेरिया यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.