आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट जेसीबीत बसून मंडपात आली नवरी:जालना तालुक्यातील जामवाडी येथील विवाहात शेतकऱ्याचा वेगळाच रुबाब

प्रताप गाढे | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामवडी येथील विठ्ठल भीमराव राजकर यांची कन्या वृषालीचा विवाह जालना येथील अष्टविनायक लॉन येथे येवला येथील सागर शंकरराव आहेर यांच्या बरोबर पार पडला. नवरदेवाची वरात निघाली, मित्र परिवाराचा नाच गाणे झाले.. अन् मंडपाच्या दाराशी नवरीची प्रतीक्षा सुरू झाली... थोड्याच वेळात नवेकोर सजवलेले जेसीबी घर घर आवाज करत मंडपात शिरले आणि सर्वजण याकडे पाहून अचंबित झाले. नवरी चक्क जेसीबीत बसून आली. हा सगळा खटाटोप मुलीच्या काकाने लाडाच्या मुलीसाठी केला. ही बाब सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरली.

कुटुंबीयांकडून जय्यत तयारी

जामवाडी येथील विजय भीमराव राजकर अन् विठ्ठल भीमराव राजकर हे सुशिक्षीत कुटुंब असून यातील विठ्ठल राजकर यांची कन्या वृषाली एमबीए झालेली. घरातील लहान मुलीचा विवाह असल्याने राजकर कुटुंबीयांकडून जय्यत तयारी करण्यात आली. मूळ शेतकरी कुटुंब असल्याने शेतीत नव नवीन प्रयोग करण्यात ते अग्रेसर आहेत. लग्नात शेतकऱ्याचा रुबाब असावा म्हणून मुलीचे काका विजय राजकर यांनी मुलीला मंडपात आणण्यासाठी थेट जेसीबी आणण्याचे नियोजन केले. यासाठी थेट नवीन जेसीबी मागवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...