आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पट्टाभिषेकनंतर आष्टीत विश्वचैतन्य शिवाचार्य महाराजांचे स्वागत; आष्टीतील सिद्धेश्वर मंदिर येथून अश्वरथमध्ये भव्य मिरवणूक

आष्टी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथे १२ जुन रविवार या रोजी शिवसंत लक्ष्मण महाराज संस्थान व मोरगेश्वर स्थानचे नूतन मठाधिपती सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज यांची लिगांयत समाज व आष्टी येथील सर्व समाजाच्या वतीने आष्टी नगरी मध्ये भव्य शोभ यात्रा काढण्यात आली.

मठाधिपती श्रीमत जगद्गुरु पलसिद्ध स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपती तसेच आष्टी संस्थानचे वेदांतचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या साखरखेर्डेकर यांच्या सानिध्यात साखरखेर्डा येथे पट्टाभिषेक संपन्न झाला. त्यानंतर आष्टी नगरी मध्ये त्यांचे आगमन झाल्या नंतर लिगांयत तरूणांकडून आष्टी मोटर सायकल रँली काढण्यात आली. त्यांतर सिद्धेश्वर मंदिर येथून अश्वरथ मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. भव्य मिरणूकी मध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात गुरूंच्या जयघोषात रांगोळी, फुलांचा, वर्षाव आष्टी नगरी जसे “ साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा” असा शोभ यात्रा पार पडली. तसेच शोभा यात्रा आष्टी सिद्धेश्वर मंदिर येथून महाविर चौक, बस स्टॅन्ड परीसर ते मोढा परिसर व शिवसंत लक्ष्मण महाराज समाधी स्थळ संपन्न झाली. यानंतर धर्मसभा पार पडली. सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज म्हणले की, माझे जिवन हे गुरु चरणी व समाजासठी अर्पण केललं एक फुल आहे. सद्गुरूच्या कृपादृष्टीमुळे अंधकार नाहीसा होतो. गुरुपदेश अनुसार मार्गक्रमण केल्यास सर्व कार्य सिद्धीस जातात आपणही शेवटच्या श्वासापर्यंत गुरु प्रदेशानुसार मार्गक्रमण करून अखंड लोक हित जोपासण्याचा या धर्म पिठाचा अखंड सेवा देत आष्टी येथील शिवसंत लक्ष्मण महाराज यांची ५५०९ अंभागाची गाथा देशातील प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी साखरखेर्डा येथील नूतन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज म्हणाले की, संन्यास घेऊन मठ सभांळणे म्हणजे तलवारीच्या धरेवर चलण्यासारखे काम आहे. त्यासाठी खूप मोठा त्याग कराव लागतो व प्रत्येक माणसाचे जिवन गुरु शिवाय सार्थक होत नाही. गुरु शिष्य ही परंपरा अनेक शतकापासून चालू झाली असून माझ्या गुरुंनी जो उपदेश दिला मी त्या मार्गावर चालत असून समाजाच्या हितासाठी काम करणं व समाजाला योग्य दिशा दाखवून हेच माझं गुरूचा आशीर्वाद आहे. त्या मार्गावर माझे जिवन समर्पित केले असल्याचे म्हणाले. यावेळी शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हादगाव जिल्हा नांदेड, काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, डिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, गुरु व्यंकटस्वीमी शिवाचार्य महाराज पिपळगाव हे या शिवाचार्य उपस्थित होते.

या बरेाबरच माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिप सदस्य राहुल लोणीकर, माजी जिप सदस्य बळीराम कडपे, पसचे उपसभापती रामप्रसाद थोरात, माजी सभापती सिद्धेश्वर सोळंके, सरपंच सादेक जाहागीरदार, आष्टी ग्राप सदस्य उपस्थित होते. यावेळी ढोणवाडी, पिंपळी धामणगाव, मेहकर, पानकनेरगाव, साडेगावच्या ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आष्टी पोलीस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी नागरे यांच्यासह सुरक्षेची जबाबदारी पाहिली.

बातम्या आणखी आहेत...