आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:क्रीडा ज्योतीचे बदनापूरला स्वागत

बदनापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या या राज्य क्रीडा महोत्सवाचा पाश््र्वभूमीवर ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान तुळजापूर ते औरंगाबाद या दरम्यान मशाल रॅली क्रीडा ज्योत चे आयोजन करण्यात आले आहे. कुलगरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करून मशाल रॅलीस सुरूवात झाली. शुक्रवारी मशाल रॅली क्रीडा ज्योत चे आगमन बदनापूर येथे झाले असता राज्य क्रीडा महोत्सवाच्या विचारांनी प्रज्वलित झालेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत बदनापूर शहरात प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर यांच्यासह सहकाऱ्यांनी केले.

३ ते ७ डिसेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित २४ वा महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरातून बुधवारी सकाळी मशाल प्रज्वलित करून मशाल रॅलीस प्रारंभ झाला. मशाल रॅलीचे समन्वयक डॉ. संदीप जगताप, डॉ. पांडुरंग रणमाळ, डॉ. भुजंग डावकर, गणेश जाधव, कृष्णा फले, जावेद शेख आदींसह विविध महाविद्यालयातील खेळाडू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बदनापुर येथे बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील १ हजार विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर, क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. खान नाजमा, सिद्धार्थ मुणगे, श्रीनिवास मुणगे, डॉ. भरत मिमरोट, मुख्यध्यापिका निशिगंधा देशमुख, डॉ. कांबळे एस. एम., डॉ. अशोक मुंढे, क्रीडा प्रशिक्षक किरण पाटील,सुनील जायभाये,आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...