आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवप्रेमींतर्फे जल्लोष:मातृतीर्थ ते स्मृतिस्थळ पालखी सोहळ्याचे जालन्यात स्वागत, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जल्लोष!

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मातृतीर्थ सिंदखेड राजा ते स्मृतिस्थळ पाचाड (जि. रायगड) निघालेल्या पालखी सोहळ्याचे जालन्यात शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमींतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आलेली पालखी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून जालना शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह येथे सर्व जिजाऊ भक्त व शिवप्रेमींच्या वतीने पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय...., छत्रपती संभाजी महाराज की जय....जय जिजाऊ, जय शिवराय ....! अशा गगनभेदी घोषणा देत शिवप्रेमींनी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला. यावेळी माँ जिजाऊंच्या माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे अरविंद देशमुख, अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, अंबादास साबळे, रोहित देशमुख, किरण देशमुख, सागर पाटील, कैलास सरकटे, आकाश ढेंगळे, मिलिंद गंगाधरे, योगेश सोळुंके, बाळासाहेब देशमुख, कुणाल देशमुख, गणेश सराटे, रोहित खैरे, विवेक वैद्य, ओम लोंढे, सुमीत भुरे, शुभम राजपुरे यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मार्गक्रमण करत पालखी माँ जिजाऊ यांचे स्मृतिस्थळ पाचडकडे (जि. रायगड) रवाना झाली.

मातृतीर्थ सिंदखेड राजा ते स्मृतिस्थळ पाचाड (जि. रायगड) निघालेल्या पालखी सोहळ्याचे जालन्यात शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमींतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...