आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंदखेडराजा येथून निघालेल्या व नायगांव येथे जात असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले क्रांतिज्योत अभिवादन यात्रेचे जालना शहरात महात्मा फुले विचार मंच व फुले प्रेमी जनतेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दरवर्षी सिंदखेङराजा येथून ही क्रांतिज्योत अभिवादन यात्रा निघून नायगांवला पोहचते. मार्गामध्ये असणारे गांवे व शहरामध्ये या याञेचे स्वागत होते. यावर्षी ही अभिवादन यात्रा २ जानेवारी रोजी जालना येथे आली असताना समर्थ ट्रेङर्स, अंबङ चौफुली येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याञेसोबत आलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी अश्विन अंबेकर, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, प्रा.राजकुमार बुलबुले, एकनाथराव गायकवाङ, साहेबराव जैवळ, रखमाजी गोरे,धर्मा इंगळे,अनिल वाघमारे, दत्ता पवार, शिवानंद केळकर, राजीव जमधङे, मेहेञे, सुहासिनी जैवळ, सविता मुंढे, ङाॅ. मनिषा जैवळ, पल्लवी जैवळ, नारायण बुलबुले, कपील पवार, बालाजी खरात, दिलीप पाऊलबुध्दे, लक्ष्मण घनवट, ङाॅ. योगेश जैवळ, निवृत्ती वीर, गणेश सोळुंके, जगदीश जैवळ, संतोष ङोंगरखोस, सचिन जयवळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.