आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा महोत्सव:फत्तेपुरात दुर्गामातेच्या स्वारीचे स्वागत; अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फत्तेपूर गावात यात्रा महोत्सव

फत्तेपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात अक्षय्य तृतियेला हनुमान मंदिरासमोर सोंगाचे कार्यक्रम पार पडले. यात विविध सामाजिक व धार्मिक विषयांवर स्थानिक कलाकारांनी देखावे सादर केले.

बुधवारी सकाळी गावातून आई दुर्गामातेचे सोंग काढण्यात आले. महिलांनी दुर्गामातेची आपापल्या घरासमोर पूजा केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे यात्रा महोत्सव साजरा करता आला नाही. आता निर्बंध हटवल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवला. यंदा चौथ्या पिढीतील तरुणाईने सोंगाची सूत्रे हाती घेतले होती.

गावात देवीच्या सोंगाची शतकोत्तर परंपरा जोपासली जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हे सोंग पाहण्यासाठी सायंकाळी गावात गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी दुर्गामातेचे राजू गायकवाड यांच्या घरासमोरून सोंग काढण्यात आले होते. तर या मातेच्या सोंगाची सांगता हनुमान मंदिराच्या आवारात महाआरती व रेवड्या उधळणाने करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...