आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल:पक्षाने पोसले तेच मुळावर उठले, गद्दारांना जनतेची माफी नाही

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांना पक्षाने मोठे केले त्यांनी आता पक्षालाच संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु या गद्दारांना जनता कदापिही माफ करणार नाही. लोकांच्या मनातील हाच त्वेष वारंवार दिसून येतो. उध्दव ठाकरे यांची जनतेच्या मनातील प्रतिमा व त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून केलेले कार्य जनता आजही विसरलेली नाही, असे प्रतिपादन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केले. जालना येथील शिवसेना भवनात आयोजित पदाधिकाऱ्यांंच्या बैठकीत खासदार राऊत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, मुरलीधर शेजुळ, मनिष श्रीवास्तव, रावसाहेब राऊत, हनुमान धांडे, अशोक आघाव, बाबासाहेब तेलगड, बाबुराव पवार, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी शिवाजी शेजुळ, गणेश काळे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुगेश काठोठीवाले, युवासेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख भरत सांबरे, जालना जिल्हा युवा समन्वयक मंगेश गव्हाड, युवासेना शहरप्रमुख अकुंश पाचफुले आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना खासदार विनायक राऊत म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे व शासनाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे २६ नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांचा महामेळावा घेत आहेत. राज्यात झालेले सत्तांतर हे सामान्य जनतेला मान्य झालेले नाही. तर पक्षाची सदस्य नोंदणी मोठ्या संख्येने करावी व पक्ष संघटन मजबुत करावे, असे आवाहनही खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले अपेक्षार्ह वक्तव्याचा तीव्र निषेधही त्यांनी केला.

बैठकीचे प्रास्ताविक करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी मागील काही दिवसांत जिल्ह्यात राबविलेल्या मशाल रॅली, शेतकरी दिंडी, विविध आंदोलने, सदस्य नोंदणी अशा विविध उपक्रमांचा उल्लेख करुन पक्ष बांधणी सातत्याने मजबुत करीत असल्याचे सांगून सर्व पदाधिकार्‍यांनी आपआपल्या विभागातील गावातील, बुथप्रमुख, गटप्रमुख यांची मजबुत बांधणी करुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्याचे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या चिखली येथील सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, हरिभाऊ पोहेकर, कुंडलिक मुठ्ठे, अशोक बरर्डे, प्रकाश सोळुंके, माजी नगरसेव विजय पवार, माजी जि.प. सदस्य कैलास पुंगळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...