आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेव्हा जेव्हा आपण आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याचं ज्ञान घेतो तेव्हा तेव्हा कायद्याबरोबरच आपण संस्कार देखील शिकत असतो, असे प्रतिपादन अॅड. जगन्नाथ भुतेकर यांनी केले. जालना येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, अँटी रॅगिंग, आयसीसी समिती, कदीम जालना पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने //"स्त्रियांचे हक्क आणि कायदे//" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले हाेते.
यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. विजय नागोरी तर प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक समुपदेशक प्रतिभा काचेवार, महिला आणि बाल समुपदेशक रोहित मस्के, अॅटी रॅगिंग आयसीसी समिती अध्यक्षा उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या पटवारी, डॉ. स्वाती महजन, गोसिया शेख आदींची उपस्थित होते.
कौटुंबिक समुपदेशिका प्रतिभा काचेवर यांनी समुपदेशकाचा जो काही व्यवसाय असतो तो कसा असतो त्याबद्दल आणि लग्न झालेल्या पती-पत्नी मध्ये बिनसले असल्यास त्यांच्यात समुपदेशक म्हणून योग्य विचार देऊन समीट घडून आणण्याचे काम केले जाते. यावर जर समीट घडून येतच नसेल तर महिलांना कोणते कोणते अधिकार आहेत. असे सांगितले. रोहित मस्के म्हणाले, आपलं सौंदर्य झाकून ठेवल्यास आपण ब्रॅण्डेड मध्ये गणल्या जाऊ म्हणून आपली किंमत आपणच वाढवली पाहिजे. तरच आपणास महत्त्व प्राप्त होईल. अन्यथा आपण आपल सौंदर्य जपलो नाही तर सामान्यामध्ये आपली गणना होईल. आपल्याला एवढं महत्त्व राहणार नाही. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. कुंदनलालजी अग्रवाल व श्रीमती दानकुंवर माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादनाने करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.जयश्री वाडेकर यांनी तर डॉ. स्वाती महाजन यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.