आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र:सेल्फी घेताना खदानीत माेबाइल पडला, तो काढताना पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेला सुटी असल्यामुळे खरपुडी शिवारात फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याने एका खदानीच्या ठिकाणी सेल्फी काढत असताना मोबाइल खदानीत पडला. मोबाइल काढत असताना खदानीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अर्णव कैलाश गिरी(१५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. गोलापांगरी येथील अर्णव कैलाश गिरी हा शिक्षण घेण्यासाठी जालना येथे मल्टिपर्पज शाळेजवळ भाड्याने रुम घेऊन राहत होता.

रविवारी सुटी असल्याने तीन मित्र व दोन मैत्रिणी असे पाच जण खरपुडी येथे फिरायला गेले. परिसरातील एका खदानीजवळ सेल्फी काढत असताना त्याचा मोबाइल पाण्यात पडला. मोबाइल घेण्यासाठी तो पाण्यात उतरला. मात्र मोबाइल हाताला लागत नसल्याने आणखी खाली गेला. पोहता येत नसल्याने त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खरपुडी येथील सरपंचांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक खाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मजीद, संदीप बेरड, किशोर जाधव, अशोक राऊत, यांनी घटनास्थळ धाव घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला.

बातम्या आणखी आहेत...