आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:ज्याचे कष्ट प्रामाणिक तो जीवनात कधीही मागे वळून पाहत नाही ; अवघडराव सावंगीत कार्यक्रम

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कष्टाला कुठलाही शार्टकर्ट नसतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट आणि मेहनती शिवायपर्याय नाही. ज्यांचे कष्ट प्रामाणिक असतात तो जीवनात कधीही मागे वळून पाहत नसल्याचे विठ्ठल महाराज सिरसाठ यांनी सांगितले.भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांवगी येथे दरवर्षी प्रमाणे यंदा देखील कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत ग्रामस्थांच्या वतीने ३४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त किर्तनाचे पहिले पुष्प विठ्ठल महाराज सिरसाठ यांनी गुंफले. निसर्ग हा माणसाला भरभरून देत असतो. आणि देताना त्याचेही मुल्यही लावत नाही. परंतु स्वार्थी जातीतील माणूस आज चार पैशांसाठी निसर्गाला हानी पोहचायचे पाप करीत आहे. शेत परिसरात भरमसाठ वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे.

कोरोना काळात लोकांना ऑक्सीजनचे महत्त्व कळाले आहे. अनेकांना वारेमाप पैसे मोजून देखील ऑिक्सजन वेळेवर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. वृक्ष हे माणसाला विनामुल्य प्राणवायू देण्याचे काम करतात. यासाठी प्रत्येकाने वृक्ष संगोपन करणे गरजेचे आहे. आज समाजातील चिञ बदलत चालले आहे. पैशाच्या हवास्यापोटी रक्तातील नाते दुरावत आहे. परंतु संघटन असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. या करिता संयुक्त कुटुंब पद्धतीने जगले पाहिजे असा सल्ला दिला.

आज प्रत्येकाचे आई-वडील आपल्या मुला-मुलींना रक्तांच पाणी आणि हाडांच माड करुन शहराच्या ठिकाणी शिकवु लागले आहे. कारण त्यांना माहीत आहे. शहराच्या ठिकाणी माझा मुलगा-मुलगी शिकली तर नक्कीच मोठा साहेब होईल. परंतु शहरात शिकणाऱ्या तरुणाईला आई-वडील बघत असलेल्या अपेक्षा आणि स्वप्नांचे काहीही एक वाटत नाही. आणखी व्यसनाच्या नादी लागुन त्यांनी आपले भावी आयुष्य खराब करण्यास सुरूवात केली आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. व्यसनापायी अनेकांचे संसार उघड्यावर पडाले आहे. दारुड्या व्यक्तीच्या घराकडे बघण्याचा इतरांचा दृष्टीकोन देखील वेगळा असतो. यासाठी व्यसनमुक्त जीवन जगा आणि समाजात तसेच कुटुंबात किंमत मिळवा, असे आवाहन विठ्ठल महाराजांनी केले. दरम्यान, आयुष्याच्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचे असेल तर पहिले माणसं ओळखणे शिका असे सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.

चांगल्या व्यक्तीला विरोध
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. कारण जीवनात विरोधक असल्याशिवाय माणसाला प्रगती साधता येत नाही. त्यापासूनच आपल्याला ऊर्जा आणि चेतना मिळते. यासाठी जीवनात मिळालेल्या विरोधकांचा राग न मानता त्यांचे स्वागतच करा. कारण मानवी जीवनात विरोध असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नसते याचे भान प्रत्येकाने ठेवण्याचा सल्ला दिला.

बातम्या आणखी आहेत...