आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील रामनगर येथे क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव आणि महिला आर्थिक उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी आर. यु. गोरे यांच्या करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ, उषाताई शिंदे, अयोध्या टेमकर, हलिमा शेख, संतोष थेटे, देविदास थोरात, गेंदाबाई मोकाटे, अंजना मोरे, मुन्नी शेख, अनघा मोरे आदी उपस्थिती होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला. गोरे म्हणाले की, आज समाजात विधवा महिलाना अपमानास्पद, दुय्यम वागणूक दिली जाते. तसेच तिच्याकडे वाईट नजरेने बघितले जाते.
एवढेच नव्हे तर वडिलांना अग्नी देता येत नाही. शिवाय मुलाला किंवा मुलीला विधवा असल्याने हळद लावता येत नाही. यामुळे विधवांचा आत्मसन्मान दुखावला जातो. यासाठी सर्वांनी मिळून विधवा प्रथा व अनिष्ट रूढी बंद केल्या पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले. संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३० ग्रामसभेतून ठराव मंजूर करून तो शासनाला पाठविण्यात येणार असून स्थानिक आमदारांच्या मदतीने पावसाळी अधिवेशनात विधवा सन्मान आणि संरक्षण कायदा मंजूर होण्यासाठी सर्वस्तरातुन पाठबळ उभारले जाईल असे मत विष्णू पिवळ यांनी व्यक्त केले. कुंकू पुसणे, जोडवे काढणे या प्रथा बंद करण्यासाठी महिलांनी समोर आले पाहिले असे उषा शिंदे म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.