आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पट्ट्याने गळा आवळून‎ जिंतूरमध्ये पत्नीचा खून‎:माहेरहून पत्नीला आणत केला घात, पती ताब्यात‎

जिंतूर‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जालना रोड परिसरातील‎ रमाबाईनगर परिसरात पतीने पत्नीचा‎ ‎ गळा दाबून खून‎ ‎ केल्याची घटना‎ ‎ घडली. १३ मार्च‎ ‎ रोजी सकाळी हा‎ ‎ प्रकार उघडकीस‎ ‎ आला. सुनीता राजू‎ ‎ अवचर (२४) असे‎ ‎ खून झालेल्या‎ महिलेचे नाव आहे.‎ याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती‎ अशी की, जिंतूर शहरातील जालना‎ रोडवरील रमाबाईनगर येथील रहिवासी‎ राजू अवचर हा मनोरुग्ण असल्याने‎ त्याच्यावर काही दिवसांपासून छत्रपती‎ संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार‎ सुरू हाेते. काही दिवस आ धीच माहेरी‎ गेलेल्या पत्नीला सासरी आ णण्यात‎ आ ले हाेते. १२ मार्च राेजी रात्री २.३०‎ वाजेच्या सुमारास पत्नी सुनीता या‎ झोपेत असताना कंबरेचा पट्टा काढून‎ राजूने सुनीता यांचा गळा आ वळण्याचा‎ प्रयत्न केला. याची माहिती‎ नातेवाइकांना कळताच त्यांनी‎ पाेलिसांना माहिती दिली. पाेलिस‎ निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पाेलिस‎ उपनिरीक्षक चाैरे, सहायक पाेलिस‎ निरीक्षक विकास कोकाटे, पाेलिस‎ काॅन्स्टेबल जोगदंड, कांबळे, चव्हाण,‎ बंदुके आ दींचे पथक घटनास्थळी‎ पाेहाेचले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित‎ केले. आरोपी पती राजू अवचरला‎ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...