आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंकुशराव टोपे महाविद्यालयातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही कर्मयोगी अंकुशराव टोपे माजी विद्यार्थी फाउंडेशनतर्फे बैठकीत देण्यात आली. रविवारी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रारंभी अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, माजी प्राचार्य आर. जे. गायकवाड हाेते. प्रारंभी माजी विद्यार्थी तसेच प्रमुख पाहुण्यांनी अापल्या भावना व्यक्त करत विद्यार्थी हित लक्षात घेत सूचना मांडल्या. तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष सीए व्ही. यू. धांडे व सचिव कालिंदा कऱ्हाळे-उढाण यांनीही सर्व सूचनांची नोंद घेत येत्या काळात त्यानुसार मार्गक्रमण करण्याचा मानस व्यक्त केला.
दरम्यान, ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी आधारवड असलेल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेने गत ४८ वर्षांत अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले असून शिक्षण, वैद्यकीय, विधी, कृषी, पत्रकारिता, संरक्षण, समाजकारण, राजकारण, उद्योग-व्यवसायात ते आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. यात मोलाची भूमिका घेत गोरगरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे. या वेळी अॅड. दीपक कोल्हे, राजेश कंकाळ, सुरेश सोनवणे, कल्पना घुगे, सीए लड्डा अादींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ. शकील खान, डॉ. सुजाता देवरे, डॉ. सीमा निकाळजे, डॉ. प्रल्हाद गायकवाड, डॉ. अविनाश भालेराव आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. मधुकर गरड, सूत्रसंचालन डॉ. रूपाली कदम यांनी केेले, तर आभार डॉ. अर्जुन जाधव यांनी मानले.
विद्यार्थी करताहेत सिद्ध सर्वच क्षेत्रात गुणवत्ता
बदलल्या काळानुसार पायाभूत सुविधांची उभारणी करत डिजिटल ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षण व संशोधन केंद्र, समुपदेशन, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, माती परीक्षण प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. यामुळे सर्वच क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करत असल्याचा सूरही माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतातून उमटला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.