आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:झुकेंगे नहीं... शिवसेनेची शहरात पोस्टरबाजी, अंबड चौफुली परिसरात शिवसैनिकांची घोषणाबाजी

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने शहरात बॅनर लावून निषेध केला. झुकेंगे नहीं...अशा आशयाच्या बॅनरमधून सेनेने आपण सूडबुद्धीने कारवाई केली जात असलेल्या शिवसेना नेत्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

जालना शहरातील नूतन वसाहत, अंबड चौफुली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत तीव्र निषेध केला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे. हे सरकार आता पडणार नाही हे विरोधकांना पक्के ठाऊक असल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून या ना त्या मार्गाने राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम राज्यात भाजपच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणाले. जालना शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शहरातील सर्वच चौकांत फलक लावून केंद्र सरकारच्या कृत्यांचा तीव्र निषेध केला. या फलकावरील “चल पडे जो कदम अब वह रुकेंगे नहीं, करले कितने भी सितम ऐ दिल्ली, तेरे सामने झुकेंगे नहीं’ तसेच “पडे कितना भी सूखा, ये पेड सूखेगा नही, जुल्म ढाये कितने भी सियासत ये शख्स झुकेगा नहीं’ हा मजकूर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, जावेद शेख, अॅड अश्फाक पटेल, घनश्याम खाकीवाले, दुर्गेशकाठोठीवाले, रविकांत जगधने, विजय जाधव, महादू गायकवाड, नरेश कपूर, गणेश लाहोटी, जीवन खंडागळे, कुणाल जाधव, राम गाडेकर, विक्रम सुकुंदल, सुरेश वाघमारे, गोपी नाटेकर, राम खांडेभराड आदींची या वेळी उपस्थिती होती. अत्यंत जुने कोणतेही विषय उकरून काढून आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्यांना सातत्याने अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सरकारची व पक्षाची भक्कमपणे बाजू मांडणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई करण्यात येत आहे. तर लोकशाही मार्गाने अस्तित्वात आलेल्या सरकारला काम करू दिले जात नाही, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...