आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कुस्तीपटूंसाठी आधुनिक व्यायामशाळेसाठी प्रयत्न करणार; आ.गोरंट्याल यांचे आश्वासन

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील तरूणाला कुस्त्याचा छंद आणि त्यांच्याकडे विशेष कौशल्य आहे परंतु आधुनिक व्यायामशाळा उपलब्ध नसल्यामुळे अशा तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी आपण या भागात आधुनिक व्यायामशाळेची उभारणी करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करु असे आश्वासन आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले.

स्व. पैलवान भानुदास राजे जाधव यांच्या स्मरणार्थ निरखेडा (ता. जालना) येथे कुस्तांची दंगल आणि व्यायामशाळेचे उद्घाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते रविवारी रोजी करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणुन शहर कॉग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, अण्णासाहेब खंदारे, पांडुरंग पोहेकर, संजय शेजुळ, निळकंठ वायाळ, कृष्णा पडुल आदींची उपस्थिती होते.स्व. पेहलवान भानुदास जाधव यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन फित कापून आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ग्रामीण भागातील तरुणांला कुस्तीचा क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. त्यांना मैदान आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते मागे आहे परंतू या भागात आपण जातीने लक्ष घालून आधुनिक व्यायामशाळा उभं करण्यासाठी पुरेपुर मदत करु.

राजे जाधव कुंटूबांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ मोठी जागा उपलब्ध करु दिली आहे. त्यांची कुस्ती विषयांची तळमळ आपला सर्वांना दिसून येत आहे. स्व. पेहलवान भानुदासराव राजे जाधव यांनी आपल्या जीवनामध्ये कुस्ती क्षेत्रात ग्रामीण भागाचे नाव लौकिक केले होते. याची आज आठवण झाल्या शिवाय राहत नाही. असे आमदार गोरंटयाल म्हणाले. प्रारंभी राजे जाधव कुंटूबांतील वसत राजे जाधव, भागवत राजे जाधव, भगवान राजे जाधव, नामदेव राजे जाधव, संजय राजे जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कुस्ती स्पर्धेत जालना औरंगाबाद जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग नोंदविला. यावेळी विनोद यादव, दत्ता शिंदे, दिलीप मोरे, सोपान तिरूखे, बद्री भनसाळे, मनोहर उघडे, रामजी शेजूळ, ज्ञानेश्वर डुकरे, बाळासाहे सिरसाठ, गणेश खरात, समाधान शेजुळ, शिवाजी वाघ, अंजे भाऊ चव्हाण आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक वसंत राजे जाधव यांनी तर भागवत राजे जाधव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...