आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हितासाठी जालना सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. कारखाना सभासद शेतकरी,कामगार बचाव कृती समितीच्या वतीने कारखाना क्षेत्रातील गावांमध्ये आ. गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखालील आणि मुख्य संयोजक संजय लाखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शुक्रवारपासून वाघ्रळ जहागीर येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर नेर आणि रामनगर येथे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या.या बैठकीत मार्गदर्शन करतांना आ.गोरंटयाल बोलत होते. यावेळी डॉ.संजय लाखे पाटील, अंकुशराव राऊत, डी.के.मोरे, सुरेशराव खडके, कमलाकर अंभोरे, राम सावंत, वसंत जाधव, ज्ञानेश्वर कदम, सुभाष कोळकर, नारायण वाढेकर, अरुण घडलींग, दत्ता घुले, रमेश गजर, बाळू गजर आदींची उपस्थिती होती.
आ. गोरंट्याल म्हणाले, जालना आणि बदनापूर या दोन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन माजी खा. बाळासाहेब पवार यांनी पाठपुरावा करून रामनगर येथे जालना सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. इतकेच नाही तर त्यांनी सदर कारखाना हा चांगल्या पद्धतीने चालवून देखील दाखवला. त्यामुळे कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि सभासदांना दिलासा मिळाला होता.
खोतकर यांनी कारखाना हडपल्याचा आरोप
मुख्य संयोजक डॉ.संजय लाखे पाटील यांनी आपल्या भाषणात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप करत कारखाना कशा पद्धतीने हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित जनजागरण बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही लाखे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.