आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानकरी‎:जीवनराव पारे विद्यालय विभागीय‎ समूह नृत्य स्पर्धा 2023 चे मानकरी‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व‎ प्रजासत्ताक दिनानिमित्त कला क्रीडा दुत फाऊंडेशन‎ महाराष्ट्र व स्वप्नपुर्ती सांस्कृतिक व क्रीडा मंडळ‎ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय‎ समुह नृत्य स्पर्धा २०२३ मध्ये //"जीवनराव पारे विद्यालय‎ चंदनझिरा//" जालना येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक‎ पटकावला. विद्यार्थीनींनी //"चंद्रा//" लावणी नृत्य सादर‎ केले.

या नृत्यामध्ये निकिता पंडित खांडेभराड, कावेरी‎ विश्वंभर निरेवाड, साक्षी विष्णू खरात, वैष्णवी संतोष‎ करडे, निकिता अशोक ढेंम्पे यांनी उत्कृष्ट सादरीकरण‎ केले. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचे‎ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट‎ कामगिरी केल्याबद्दल शाळेच्या वतीने शाळेचे‎ मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...