आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांच्या मनाचा ठाव:मुलीच्या जन्माने घर घर होते, वैभवही येते जीवनात ; कवी हिवाळे

परतूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सव, गणेशोत्सव आणि कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पाठक होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची उपस्थिती होती.आकाशवाणीचे निवेदक कवी सुरेश हिवाळे यांनी मुलगी ही कविता सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेत मुलीच्या जन्माने, घर घर होते, वैभवही येते जीवनात, आपल्याला हवी, कन्या एक गोड, जगण्याची ओढ, लावते ती. सेलू येथील ग्रामीण कवी प्रभू शिंदे यांनी ‘मायीला म्हणावं’ या आपल्या कवितेतून सासूरवाशीण लेकीची व्यथा सांगितली. सुचिता कुलकर्णी यांनी आपल्या कवितेतून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

नको नको रे माणसा, नको व्यसनाधीन होऊ, नको दुःख डोईवर, नको कुटुंबास देऊ. ही कविता सादर केली. सरोजिनी एडपल्लवार यांनी आपल्या ‘शेती’ या कवितेतून पावसामुळे झालेला आनंद चित्रित केला, ‘नवलाई आली नवी, कष्टालाही साथ आली, निसर्गाचे दान देवा, फुले हसलीही गाली.’ कविसंमेलनाचे अध्यक्ष लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील डॉ. अशोक पाठक यांनी ‘माय’ आणि’ ही पृथ्वी सगळ्यांची आहे’ या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. या कविसंमेलनात राहुल पंडागळे, मिलिंद अवसरमोल, श्रावणी बरकुले, वेदिका नंद, रमेश आढाव यांनी कविता सादर केल्या. महादेव राऊत यांनी आभार मानले. कविसंमेलन यशस्वितेसाठी गजानन पुंड, नितीन पुंड, विदुर जइद, नामदेव जइद यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...